Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात पुन्हा 'कोयत्या'ची दहशत; गणेश विसर्जनाच्या दिवशीच दोन खून

पुण्यात पुन्हा ‘कोयत्या’ची दहशत; गणेश विसर्जनाच्या दिवशीच दोन खून

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : राज्यभरात गणेश विसर्जनाची धामधूम सुरु आहे. त्यात पुण्यात पुन्हा कोयता गँगने धुमाकळू घालत दहशत माजवली आहे. गणेश उत्सवादरम्यान पुण्यामध्ये कोयता हल्ल्याचे दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. त्यात प्रेम प्रकरणातून एका महिलेच्या डोक्यामध्ये कोयत्याने हल्ला करत तिची हत्या करण्यात आली. तर एका कामगाराची कोयत्यानेच हल्ला करत हत्या करण्यात आली आहे. या दोन्ही घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गणपती विसर्जनाच्या दिवशी दोन खून झाले आहेत. यातील पहिली घटना विश्रांतवाडी येथे घडली आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महिलेवर हल्ला करणा-या आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

तर दुसरी घटना बावधन परिसरामध्ये घडली आहे. या परिसरात कामगाराची हत्या करण्यात आली आहे. प्रवीण कुमार भोला महतू (वय-26) असे तरुणाचे नाव असून अज्ञात व्यक्तीने त्याची हत्या केली आहे. मूळचा बिहारचा असलेला प्रवीणवर कोयत्याने गळ्यावर वार करत त्याची हत्या करण्यात आली.

दरम्यान, यापूर्वीही पुण्यात कोयता गँगने दहशत माजवली होती. शहरात अनेक ठिकाणी कोयता गँगच्या सदस्यांनी हैदोस माजवला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments