Tuesday, June 3, 2025
Homeक्राईम न्यूजपुण्यात ठाकरे गटाला खिंडार; 'या' शिलेदाराचा शिंदे गटात प्रवेश

पुण्यात ठाकरे गटाला खिंडार; ‘या’ शिलेदाराचा शिंदे गटात प्रवेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीच्या तोंडावरच पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील ठाकरे गटाचे नेते आनंद गोयल यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांची शहर संघटक पदी निवड करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुषमा अंधारे यांचे जवळचे निकटवर्तीय आनंद गोयल यांनी ठाकरे गटाची साथ सोडली. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटात प्रवेश करताच त्यांची शहर संघटक पदी निवड करण्यात आली. शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या प्रयत्नांना यश आले. ठाकरे गटाच्या अनेक आजी आणि माजी नगरसेवकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि निष्ठावान शिवसैनिक आनंद गोयल यांची पुणे शहर संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती २४ मे २०२५ रोजी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की ही नियुक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे पुण्यात ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments