Sunday, June 1, 2025
Homeक्राईम न्यूजपुण्यात गोळीबाराचा थरार..! गाडीला कट लागल्यावरुन झालेल्या वादात हवेत गोळीबार; दोघांना अटक

पुण्यात गोळीबाराचा थरार..! गाडीला कट लागल्यावरुन झालेल्या वादात हवेत गोळीबार; दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीला कट लागल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रागातून आरोपीने हवेत गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. ही घटना पुण्यातल्या बिबवेवाडीमध्ये घडली आहे. गणेश भालके आणि देवा डोलारे असे गोळीबार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणात पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी दोघेही दुचाकीवरून जात होते. फिर्यादीच्या दुचाकीला आरोपीच्या दुचाकीचा धक्का लागला. याच रागातून या दोघांमध्ये वाद झाला आणि नंतर आरोपीने हवेत गोळीबार केला. मध्यरात्री गोळीबाराचा आवाज ऐकून बिबवेवाडीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

दरम्यान, गोळीबार करत आरोपींनी बिबवेवाडी परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवित हानी झाली नाही. गोळीबारानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या प्रकरणातील इतर 4 आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments