इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे पोलीस दलातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पुणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास सध्या पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
स्वरुप जाधव हे पोलीस शिपाई म्हणून पोलीस मुख्यालय या ठिकाणी कार्यरत होते. जाधव हे मूळचे कोल्हापूरचे राहणारे आहेत. सध्या ते स्वारगेट येथील पोलीस लाईन मध्ये वास्तव्यास होते. आज दुपारी त्यांनी राहत्या घरातील हॉलमधील खिडकीच्या अँगलला टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊस का उचललं याचे कारण अद्याप समोर आले नाही. याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांना घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट किंवा आत्महत्या का केली? याच कारण मिळू शकलेलं नाही. मात्र, पोलिसांनी स्वरुप जाधव यांचा मोबाईल ताब्यात घेतला असून, मोबाईलमध्ये काही पुरावे सापडतात का? याचा शोध घेत आहेत.
एका पोलिस कर्मचाऱ्याने अशाप्रकारे जीवन संपवल्याने पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. जाधव यांनी एवढं टोकाचं पाऊल उचलण्यामागे काय कारण असेल? याचा पोलीस तापस घेत असून, लवकरच कारण स्पष्ट होईल. जाधव यांनी अचानक घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांमध्ये वाढ होत असून, सध्या चिंतेचे वातावरण आहे.