इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील डी. पी. रोडवर 27 मे रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास एका कॅफेसमोर तीन तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवली. त्यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी अद्यापही पोलिसात तक्रार दाखल झालेली नसल्यामुळे या घटनेमागचे कारण अजून समोर आलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ अनोळखी तरुण दुचाकीवरून डी. पी. रोडवरील एका कॅफेजवळ आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. काफेमध्ये शिरून त्यानंतर बाहेर येऊन त्यांच्या हातात असनाऱ्या कोयत्याने कॅफे बाहेरील गाड्यांवर हल्ला करत तोडफोड केली. सुदैवाने कोयत्याने केलेल्या या हल्यात कोणीही जखमी झाले नाही. ही घडणा घडून ३ दिवस उलटून गेले तरीदेखील संबंधित पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. याबाबत “ना कोणाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे, ना पोलिसांकडून कोणती कारवाई झाली आहे,” त्यामुळे या प्रकरणातील मूळ कारण अद्यापही समोर आलेले नाही.
सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तरीदेखील, पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.