Friday, June 6, 2025
Homeक्राईम न्यूजपुण्यातील पर्यटक महिलेचा राजगडावरून कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू

पुण्यातील पर्यटक महिलेचा राजगडावरून कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वेल्हे, पुणेः पुणे येथील ऐतिहासिक राजगडावर गुरुवारी (५ जून) सायंकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. पर्यटनासाठी पतीसोबत गेलेल्या एका विवाहित महिलेचा राजगडावरून उतरताना सुमारे दीडशे फूट खोल कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली असून, मृत महिलेचे नाव कोमल सतीश शिंदे (२०) असे आहे.

वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल शिंदे पतीसह राजगडावर फिरायला गेली होती. सायंकाळच्या सुमारास किल्ला पाहून झाल्यावर खाली उतरत असताना तिचा पाय घसरला आणि ती दीडशे फूट खोल दरीत कोसळली.

या घटनेची माहिती मिळताच, वेल्हे पोलीस दलातील युवराज सोमवंशी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन टीमचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संजय चोरघे, निलेश जाधव, संदीप सोळसकर, सनी माने यांनी तात्काळ गडावर धाव घेतली. दुपारच्या वेळेस पाऊस झाल्यामुळे गडावरील वाट निसरडी झाली होती. ज्यामुळे हा भीषण अपघात घडला असल्याचे त्यांनी सांगितले.

रात्री उशिरा, सुमारे साडेअकरा वाजेच्या सुमारास, स्ट्रेचरच्या साहाय्याने कोमल शिंदेचा मृतदेह गडावरून खाली आणण्यात आला. त्यांना तातडीने वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयाचे डॉ. शिवाजी कुरणकर यांनी कोमल यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments