Tuesday, June 3, 2025
Homeक्राईम न्यूजपुण्यातील तरुणीला कोंढवा पोलिसांकडून अटक; समाजमाध्यमावर पाकिस्तान जिंदाबादचा मजकूर टाकणं भोवलं

पुण्यातील तरुणीला कोंढवा पोलिसांकडून अटक; समाजमाध्यमावर पाकिस्तान जिंदाबादचा मजकूर टाकणं भोवलं

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या एका तरुणीने इंस्टाग्राम अकाउंटवर पाकिस्तानच्या समर्थनात पोस्ट लिहिली होती. त्यात तिने पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा लिहली असल्याची माहितीसकल हिंदू समाज यांनी प्रसिद्ध केली होती. या माहितीमुळे परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खतिजा शहाबुद्दीन शेख (वय 19, रा. कौसरबाग कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. पुण्यात शिकत असलेल्या या तरुणीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली होती.

याबाबत कोंढवा पोलिसांनी तत्काळ दखल घेतली आणि संबंधित प्रकरणात तरुणीला ताब्यात घेऊन तिच्यावर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी तसेच भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा एकतेला आणि अखंडतेला धोका निर्माण केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. ‘पुणे शहरात कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवतीने सोशल मीडियावर पाकिस्तान जिंदाबाद वगैरे स्वरूपाची पोस्ट केल्याने तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोंढवा पोलीस यांनी तिला अटक केली असून पुढील कारवाई चालू आहे,’ असे वक्तव्य राजकुमार शिंदे यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments