Monday, June 2, 2025
Homeक्राईम न्यूजपुण्यातील अल्पवयीन मुलांकडून 20 गाड्यांची तोडफोड, पालकांवर गुन्हा दाखल

पुण्यातील अल्पवयीन मुलांकडून 20 गाड्यांची तोडफोड, पालकांवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : सिंहगड रस्त्यावर दारूच्या नशेत अल्पवयीन मुलांनी 20 वाहनांची तोडफोड करून दहशत माजवल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडल्याचं उघडकीस आलं होत. आता या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गाड्यांची तोडफोड करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड रस्त्यावर दारूच्या नशेत ‘आम्हीच या भागातील भाई’ असं म्हणत अल्पवयीन मुलांनी 20 ते 22 वाहनांची तोडफोड करत दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला होता. आता याची शिक्षा त्यांच्या पालकांना भोगावी लागणार आहे. या अल्पवयीन मुलांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून अल्पवयीन मुलांना दारू विकणारे हॉटेल आणि बार सील करण्यात आले आहेत. सिंहगड रोड पोलिसांनी ही धडक कारवाई केली.

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात अल्पवयीन मुलांनी त्यांच्या साथीदारासह मद्यप्राशन करत तोडफोड केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांकडून मुलांच्या पालकांसह बार आणि हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments