इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः आज पुण्यात हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असून, दिवसभर ढगाळ वातावरण राहील. सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली असून, तापमान २४°C च्या आसपास आहे. कमाल तापमान २७°C तर किमान तापमान २३°C पर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आर्द्रतेमुळे ‘फिल लाइक’ तापमान ३१°C पर्यंत जाणवू शकते. पश्चिम दिशेकडून २७ किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील.
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, जुलै २०२५ मध्ये महाराष्ट्रात सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील काही दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. आयएमडीने कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या खोऱ्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली असून, नदीपात्रांमधील पाण्याची पातळीत वाढ झाली आहे.
यावर्षी नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात मे महिन्याच्या २५ तारखेलाच (रविवार) दाखल झाला, जो गेल्या ३५ वर्षांतील सर्वात लवकर यंदा मान्सून दाखल झाला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून लवकर सक्रिय झाला आहे.
जून महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, आता जुलैमध्येही चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने पेरण्या आणि शेतीच्या कामांना गती मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता, शहरी आणि नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.