Friday, June 6, 2025
Homeक्राईम न्यूजपुणे शहरात प्रखर प्रकाश झोत सोडण्यास बंदी

पुणे शहरात प्रखर प्रकाश झोत सोडण्यास बंदी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : लोहगाव विमानतळ व लगतच्या परिसरात प्रखर प्रकाश झोत (बीम लाईट, लेझर बीम लाईट) सोडण्यावर शुक्रवारी (दि. ९) बंदी घालण्यात आली आहे. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

लोहगाव येथे हवाई दलाचा तळ व नागरी विमानतळ आहे. तेथून १५ किलोमीटर अंतरापर्यंत प्रखर झोत सोडण्यास (वायुक्षेत्र) सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पुढील साठ दिवस कायम राहील. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी युद्धजन्य परिस्थिती विचारात घेऊन पुढील ६० दिवस शहर, परिसरात प्रखर झोतास बंदी घालण्याचे आदेश शुक्रवारी दिले. वायुक्षेत्रात (एअर फिल्ड) प्रखर झोत सोडल्यास वैमानिकांचे डोळे दिपवून गंभीर अपघात होण्याची शक्यता असते.

या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहपोलीस आयुक्त शर्मा यांनी दिला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, विविध लष्करी संस्था, संशोधन संस्थांच्या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अफवांवर विश्वास ठेऊ नका

सोशल मिडियायांवर प्रसारित येणारे संदेशांची खातरजमा करणे गरजेचे आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका, तसेच अनुचित प्रकार घडल्यास त्वरीत पोलिसांना माहिती द्यावी. असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments