Friday, July 4, 2025
Homeक्राईम न्यूजपुणे शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा, नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

पुणे शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा, नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्र आणि डोंगरमाथा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढत आहे. मात्र, या पावसामुळे धरणात पाण्याबरोबर माती, गाळ आणि इतर सांड पदार्थ देखील येत असल्यामुळे पाण्यात गढूळपणा वाढला आहे. परिणामी, शहरातील काही भागांमध्ये नागरिकांना गढूळ स्वरूपाचे पाणी पुरवले जात असून, अशा पाण्याबाबत तक्रारींची संख्या वाढत आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून धरणातील पाणी जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून नागरिकांना पुरवले जाते. मात्र, सध्या पाण्यातील गढूळपणाची पातळी जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेपेक्षा अधिक असल्याने संपूर्णपणे पारदर्शक पाणी देणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उकळून, गाळून आणि शक्य असल्यास तुरटी फिरवून वापरणे गरजेचे आहे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे.

विशेषतः महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये नांदेड, नांदोशी, किरकीटवाडी, खडकवासला, सणसनगर, धायरी आणि नन्हे- या ठिकाणी पाणी प्रक्रिया न होता केवळ निर्जंतुकीकरण करून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी अधिक दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे.

“महापालिकेच्या वतीने दिले जाणारे पाणी मानकांनुसार पिण्यास योग्य असले तरी त्यात गढूळतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शक्यतो सर्वांनी पाणी उकळूनच प्यावे,” असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments