इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा येत्या ३० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठातील जवळपास सर्वच विभागातील रिक्त पदे, भोजनकक्षातील दुरावस्था, परीक्षा विभागाच्या कारभारातील त्रुटी अशा विविध विषयांवर या अधिसभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाच्या मागील अधिसभेमध्ये प्राध्यापकांची रिक्त पदे, प्रभारी कुलसचिव, प्रभारी अधिष्ठाता यांसह विद्यापीठात झालेल्या विविध आंदोलनावरून मोठी चर्चा रंगली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये विद्यापीठातील वसतिगृहाचा प्रश्न, उपहारगृहांचा प्रश्न, जामखेड येथील रत्नदीप कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्न, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मराठी विषय घेऊ न देणे, सत्र पूर्तता झाल्यानंतर निर्माण झालेला पीआरएन ब्लॉकचा विषय असे विषय समोर आहेत.
पुणे विद्यापीठाने परदेशात चार ठिकाणी उपकेंद्र सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या रैंकिंग विद्यापीठाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे याबाबींवर सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे.