Wednesday, June 4, 2025
Homeक्राईम न्यूजपुणे ट्रॅफिक अॅप" द्वारे नागरिकांना करता येणार वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकाची तक्रार

पुणे ट्रॅफिक अॅप” द्वारे नागरिकांना करता येणार वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकाची तक्रार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर आता नियम तोडल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. पुणे पोलिस “पुणे ट्रॅफिक अॅप” हे एक नवीन मोबाइल अॅप निर्मित करत आहेत. याॲपद्वारे इतर नागरिकांना नियम तोडणाऱ्या वाहनचालकांचे फोटो अपलोड करू शकता. दरम्यान, आता अॅपवर कोणती तक्रार असल्यास त्या वाहन चालकाविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.

वाहतूक पोलिस असूनही अनेक जण वाहतुकीचे नियम तोडतांना दिसून येतात. दरम्यान, असे होऊ नये त्यासाठी पुणे ट्रॅफिक अॅप सुरु केले जाणार आहे. तसेच नियम मोडणाऱ्या प्रत्येकावर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित कॅमेरा सिस्टिम लक्ष ठेवणार आहे. कॅमेरे वाहतूकचे नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवतील आणि त्यांचे गाडी नंबर कॅप्चर करणार आहे. त्यानंतर त्या चालकाच्या मोबाईलवर नंबरवर पावती पाठवली जाणार आहे.

पुणे ट्रॅफिक अॅप शहराच्या वाहतूक व्यवस्थापनात एक महत्त्वाचा बदल घडवून आणण्यासाठी लवकरच सुरु केले जाणार आहे. दरम्यान, अनेक जण अॅपच्या लाँचची आतुरतेने वाट पाहत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments