इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे शहरात आपल्या साथीदारासह पहाटेच्या सुमारास घरात शिरून मोबाईल आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या महिलेचा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना पुण्यातील कर्वेनगर भागात घडली आहे. येथे महिलेने चार मोबाईल फोन आणि रोकड चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मुरलीधर आंगरे यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सदर घटना 15 जून रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तक्रारदार मुरलीधर आंगरे हे त्यांच्या व्यवसायासाठी बाहेर गेले असता त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील कर्वेनगर परिसरातील असलेल्या दुधाने हाइट्स येथे घडली.
15 जून ला पहाटेच्या वेळी दार उघडे असल्याचे पाहून चोरट्यांनी डाव साधत चोरी केली. मोबाईल चोरीला गेला असल्याचे लक्षात आल्यानंतर वारजे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.