Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजपुणेकरांनी अनुभवला मंत्री चंद्रकांतदादांचा साधेपणा !

पुणेकरांनी अनुभवला मंत्री चंद्रकांतदादांचा साधेपणा !

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः राजकीय जीवनात काम करणारा कार्यकर्ता यशस्वी झाला की, त्याच्या डोक्यात सत्तेची नशा चढते, असे म्हणतात. पण, सत्तेची ही नशा डोक्यात न जाऊ देता; ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ हा जीवनमंत्र मानून सार्वजनिक काम करणाऱ्या व्यक्ती या दैवदुर्लभ असतात.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील हे त्यापैकीच एक व्यक्तिमत्त्व ! दादा नेहमीच आपल्या साधेपणाबाबत चर्चेत असतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांचा हा साधेपणा संपूर्ण पुणेकरांना पुन्हा अनुभवायला मिळाला. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी सर्व पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे, या गर्दीत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री इतके एकरूप झाले की, उपस्थित सर्वच आवाक झाले. कारण, विसर्जनाला जाणाऱ्या मानाच्या गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर, त्यांनी सर्वात आधी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नाश्ता उपलब्ध करून दिला. त्यानंतर मिरवणुकीचा मनमुराद आनंद लुटला.

कधी ढोल पथकांच्या ठेक्यावर ताल धरला. तर कधी ध्वज पथकात सहभागी होऊन सलामी दिली. एवढंच कशाला लहान मुलांच्या आवडीचे शुगर कॅन खरेदी करून लहान मुलांना वाटप केलं. या वेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. या वेळी अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत अनेक लहान मुले महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत फोटो काढण्यातही त्यांनी आनंद मानला. खरं तर चकाकते ते सगळेच सोने नसते. जे आहे, जसे आहे ते झळाळून व्यक्तिमत्त्व उन्नत करण्याचे काम साधेपणा करत असतो. साधेपणाची जीवनशैली अंगीकारली; तर केवळ व्यक्तिमत्त्वाचीच नव्हे; तर जगण्याचीही उंची वाढेल. त्यामुळे चंद्रकांत दादांच्या साधेपणाची भुरळ अनेकांना पडत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments