Wednesday, June 4, 2025
Homeक्राईम न्यूजपुणेः अरुंद गल्लीत अडकली गर्भवती गाय, 10 तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने...

पुणेः अरुंद गल्लीत अडकली गर्भवती गाय, 10 तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने सुखरूप काढले बाहेर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुणे अग्निशमन दलाच्या पथकाने ताडीवाला रोडवरील एका अरुंद गल्लीत अडकलेल्या एका गर्भवती गायीला यशस्वीरित्या बाहेर काढले. आठ महिन्यांची गर्भवती गाय अरुंद गल्लीत अडकली होती, गल्लीची रुंदी फक्त १.५ ते २ फूट होती. वरिष्ठ अधिकारी विजय भिलारे यांच्या नेतृत्वाखालील अग्निशमन दलाच्या पथकाने गायीला वाचवण्यासाठी सेफ्टी बेल्ट, दोरीचा वापर केला. अरुंद गल्ली आणि गायीच्या नाजूक स्थितीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना न जुमानता, पथकाने १० तासांहून अधिक काळ अथक परिश्रम करून गायीला बाहेर काढले. सकाळपासून गाईला बाहेर काढण्याचे प्रयत्न अगदी सायंकाळपर्यंत सुरु होते.

बचाव कार्य करण्यात वन्यजीव बचाव पथक, पोलिस विभाग आणि स्थानिक नागरिकांनी अथक परिश्रम घेतले. गायीला वाचवण्यासाठी पुरेशी जागा तयार करण्यासाठी पथकाला गल्लीतील पायऱ्या तोडाव्या लागल्या होत्या. पुणे अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे गायीला सुखरूप वाचवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments