Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजपिंपळगाव येथील १९ कोटींच्या विविध विकास कामांचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते...

पिंपळगाव येथील १९ कोटींच्या विविध विकास कामांचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते उद्घाटन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

यवत : दौंड तालुक्यातील राहु बेटातील प्रमुख गाव असलेल्या पिंपळगाव येथील सुमारे १९ कोटी २३ लाख रुपयांचे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांसाठी आमदार राहुल कुल यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. येणाऱ्या काळात देखील अधिकाधिक विकासकामांसाठी मदतीचे आश्वासन यावेळी आमदार राहुल कुल यांनी दिले आहे.

पिंपळगाव ते उंडवडी रस्ता व पूल ७ कोटी, नळपाणी पुवरठा योजना – ४ कोटी ९९ लाख ९६ हजार, पिंपळगाव ते लडकतवाडी रस्ता – २ कोटी, पिंपळगाव ते वाळकी (पानवटा) रस्ता (ग्रा. मा. ६५) १ कोटी ४० लाख यांसह पिंपळगावला जोडणारे व परिसरातील सुमारे १ कोटी ८३ लाख रुपयांचे अंतर्गत रस्ते, सिद्धेश्वर मंदिर परिसर सुधारणा – १ कोटी, शिरकोली पुनर्वसन येथे व्यायामशाळाइमारत बांधकाम – १५ लाख, पिंपळगाव येथील स्मशानभुमी परिसर सुधारणा – १० लाख ५० हजार, वाकण येथे काळूबाई मंदिर सभामंडप बांधकाम १० लाख, स्मशानभूमी शेड बांधकाम – १० लाख, पिंपळगाव अंतर्गत गटर लाईन १० लाख, बारा बलुतेदार चावडी येथे बहुउद्देशीय इमारत बांधकाम १० लाख, कापरेवस्ती यमाई माता सभामंडप बांधकाम ०७ लाख, गावठाण ओपन जिम साहित्य – ०७ लाख, सिध्दार्थनगर समाज मंदिर जवळ बांधकाम ६ लाख, काळुबाई मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक – ५ लाख, सिध्दार्थनगर सभामंडप बांधकाम ५ लाख, अंतर्गत गटार लाईन करणे ५ लाख यांसह जवळपास १९ कोटी २३ लाख रुपये किमतींची विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते संपन्न झाले

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, भाजपा तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे, पंचायत समितीच्या माजी सभापती उषा चव्हाण, जेष्ठ नेते माऊली ताकवणे, भीमा पाटसचे संचालक चंद्रकांत नातू, विकास शेलार, तुकाराम ताकवणे, संजय इनामके, पिंपळगावच्या सरपंच सुप्रिया नातु, उपसरपंच बजरंग लडकत, दादा शितोळे, आण्णासाहेब शितोळे, बापूसाहेब थोरात, सचिन थोरात, नानासाहेब थोरात, अर्जुन जगताप यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments