इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
इंदापूरः संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील इंदापूर तालुक्यातील मुक्कामाच्या ठिकाणांची पुणे प्रादेशिक विभाग महामार्ग सुरक्षा पथक अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या सूचनांप्रमाणे पालखी महामार्ग पाहणी करून वाहतुकी संदर्भात काही अडचणी असल्यास त्याची पूर्तता करून पालखी व वारकरी यांना मार्ग सुखकर करण्याकरिता सोलापूर महामार्ग विभागाच्या पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख व महामार्ग पोलीस केंद्र इंदापूरचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर यांनी शारदा प्रांगण बारामती, सणंसर निमगाव केतकी इंदापूर, सराटी येथील पालखी मुक्काम व विसाव्याची ठिकाणे असलेल्या पालखी महामार्गावरील चालू असलेल्या कामांची पाहणी केली.बारामती ते इंदापूर व इंदापूर ते अकलूज दरम्यान संत तुकाराम महाराज पालखी पालखी मार्ग, पालखी मुक्कामी ठिकाणी तसेच विसाव्याच्या ठिकाणी भेट देऊन तेथील स्थानिक लोकांशी चर्चा करून पालखी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी अडचणी असल्यास वाहतूक शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन केले. यासंबंधी समस्यांचे निरसन करण्याकरता संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून पूर्तता करणार असल्याचे सांगितले. तसेच पालखी बंदोबस्त दरम्यान नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही महामार्ग सुरक्षा प्रशाससाने केले आहे.