इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पर्वती परिसरात एका युवकावर १०-१२ जणांकडून मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता नऊ मुख्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मारहाण करणारे सर्वजण एकाच ठिकाणी राहत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून टोळक्याने तरुणाला मारहाण केली आहे. या प्रकरणी पर्वती पोलीस स्टेशनमध्ये ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून, या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणारा तरुण आणि त्याला मारहाण करणारी टोळी ही पुण्यात एकाच इमारतीमध्ये वास्तव्याला आहेत. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यांमध्ये गाडीच्या पार्किंगवरुन वाद सुरु होता. याच वादावरून त्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.