Thursday, June 5, 2025
Homeक्राईम न्यूजपाकिस्तान हादरला; लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट

पाकिस्तान हादरला; लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. असे असतानाच पाकिस्तानच्या लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय ड्रोनने हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाहोर हे शहर पाकिस्तानातील सर्वाधिक महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे. विशेष म्हणजे या शहराला ऐतिहासिक महत्त्वदेखील आहे. मात्र सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या स्थितीत याच शहरातून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या शहरात सकाळपासून सलग स्फोट होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लाहोरमधील औद्योगिक क्षेत्रातही स्फोट झालेला आहे. याआधीही लाहोरमध्ये अनेक स्फोट झाले होते. अगोदर या शहरात ड्रोन हल्ले झाले होते. रात्रीच्या अंधारात हे ड्रोन हल्ले झाले होते. या हल्ल्यानंतर लाहोर शहरात सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत होते. मुख्य रस्त्यांवरही काही स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान काही दिवसापूर्वीच लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम भारतीय ड्रोनने नष्ट केली होती. त्यानंतर याच परिसरात पाकिस्तानचे अत्यंत महत्त्वाचे स्थळ उध्वस्त करण्यात आल आहे. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे जरी अद्याप समोर आलं नसलं तरी दहशतवादी पोहोचवणाऱ्या पाकिस्तानच्या मुळावर हा मोठा आघात मानला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments