Sunday, June 8, 2025
Homeक्राईम न्यूजपहलगाम येथील हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव आज...

पहलगाम येथील हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव आज रात्री पुण्यात आणण्यात येणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे असं या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांचं नाव आहे. त्यांचे मृतदेह आज (ता. 23 एप्रिल) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळावर आणण्यात येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनूसार, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह सकाळी साडेसात वाजता त्यांच्या निवासस्थानी (6/16 ज्ञानदीप कॉलोनी, साई आनंद पार्क जवळ, कर्वेनगर गल्ली क्रं 2) दर्शनासाठी नेण्यात येणार असून संतोष जगदाळे यांची अंत्ययात्रा उद्या (ता. 24) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्यावर वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच कौस्तुभ गनबोटे यांची अंत्ययात्रा सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कोंढवा बुद्रुक, साळवे गार्डन समोर, चौधरी ट्रेडर्स, गनबोटे फरसाण हाऊस येथून निघणार आहे. त्यांच्यावरही वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments