इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
खडकवासलाः पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक बातमी सामोर आली आहे. सावरकर चौक येथील कॅनॉल मध्ये एका महिलेने उडी मारल्याची घटना समोर आली आहे. मात्र बीट मार्शल पोलीस पवार व उन्हाळे यांनी समय सूचकता दाखवत या महिलेचे प्राण वाचवले. ही घटना रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी की, बीट मार्शल पोलीस पवार व उन्हाळे रात्री साडे अकरा वाजता पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी सावरकर चौक येथे कॅनॉल जवळ एक महिला संशयितरीत्या कॅनल वर उभी असलेली दिसून आली. त्यावेळी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने या महिलेने पोलीसांसमोरच कॅनल मध्ये उडी मारली, तिचा जीव वाचवण्यासाठी पर्वती बीट मार्शलचे अंमलदार पोलीस पवार यांनी जीवाची पर्वा न करता वाहत्या कॅनलमध्ये खाकी वर्दी सहित उडी मारून तिला सुखरूप बाहेर काढले.
दरम्यान, स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अलाते यांच्याकडे पुढील कारवाईसाठी महिलेस सुपूर्द केले. किरण सखाराम पवार यांनी महिलेचा जीव वाचवल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.