Saturday, August 30, 2025
Homeक्राईम न्यूजनोकरीचे आमिष दाखवून तरुणाची साडेपाच लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची साडेपाच लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी-चिंचवडः चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवत दोन आरोपींनी एका तरुणाची 5 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 22 जून ते 8 जुलै दरम्यान सुसगाव, पुणे येथे घडली.

या प्रकरणी श्रीनिवास मंगन्ना करुर (वय 26, रा. सुसगाव) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, साई केलुरी आणि पौर्णिमा या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट एचआर बनून केली फसवणूक

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःला ‘कॉग्निझंट’ या आयटी कंपनीचे एचआर अधिकारी असल्याचे भासवले. त्यांनी फिर्यादीकडून 4 लाख 65 हजार रुपये आणि त्यांचा मित्र अभिषेक तळेकरकडून 80 हजार रुपये, असा एकूण 5.40 लाखांचा रकमेसाठी गंडा घातला.

पैसे घेतल्यानंतर त्यांनी बनावट ऑफर लेटर पाठवले आणि त्यानंतर कोणतीही नोकरी दिली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्याद दाखल करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास बावधन पोलीस करत असून, आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या बनावट नोकरीच्या ऑफरपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments