Sunday, June 1, 2025
Homeक्राईम न्यूजनाराज छगन भुजबळांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री, राजभवनात पार पडला शपथविधी

नाराज छगन भुजबळांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री, राजभवनात पार पडला शपथविधी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी आज राजभवन येथे राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले होते. अखेर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांची वर्णी लागली असून त्यांना अन्न व नागरी पुरवठा खाते मिळण्याची शक्यता आहे.

नाराज असलेल्या छगन भुजबळ यांचं अखेर राज्याच्या मंत्रिमंडळात कमबॅक झालं आहे. त्यांनी आज (मंगळवार) मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालेल. सरकार जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. मी कोणत्याची खात्याची अपेक्षा केलेली नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेली अन्न व नागरीपुरवठा आणि ग्राहक संरक्षण ही खाती छगन भुजबळ यांना मिळणार असल्याची दाट शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments