Friday, September 5, 2025
Homeक्राईम न्यूजनसरापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी इरफान मुलानी यांची निवड

नसरापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी इरफान मुलानी यांची निवड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नसरापूरः नसरापूर ग्रामपंचायतीत आज उपसरपंच पदाची निवड शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सरपंच उषा विक्रम कदम यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक हरपुडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या निवड प्रक्रियेत मावळते उपसरपंच नामदेव चव्हाण यांच्या कार्यकाळाची सांगता झाली तर इरफान मुलानी यांची एकमताने नवनिर्वाचित उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली.

कार्यक्रमात मावळते उपसरपंच नामदेव चव्हाण यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा आढावा घेतला. “आमच्या कार्यकाळात जशी प्रगती साधता आली तसेच पुढील काळात नवनियुक्त उपसरपंच इरफान मुलानी यांच्या नेतृत्वाखाली अधिक प्रभावी काम होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरपंच उषा कदम यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन करताना सांगितले की, “इरफान मुलानी हे यापूर्वीही उपसरपंच राहिले आहेत. त्यांचा अनुभव व कार्यशैली ग्रामपंचायतीच्या विकासाला गती देणारी ठरेल. संपूर्ण पंचायतीकडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा आहेत.”

या निवड प्रक्रियेत भोर-राजगड-मुळशीचे माजी आमदार संग्राम थोपटे उपस्थित होते. त्यांनी ग्रामपंचायतीत झालेल्या चांगल्या कामांचा गौरव करताना काही रखडलेल्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन गणेश दळवी यांनी केले. उपसरपंच पदावर निवड झाल्यानंतर इरफान मुलानी यांनी ग्रामस्थांच्या विश्वासास पात्र ठरण्याचे आणि ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments