Saturday, August 30, 2025
Homeक्राईम न्यूजनसरापूरमध्ये 'पहाडी तस्कर' सापाचा पहिलाच शोध; सर्पमित्र श्रीकांत उर्फ सोन्या खेडकर यांच्या...

नसरापूरमध्ये ‘पहाडी तस्कर’ सापाचा पहिलाच शोध; सर्पमित्र श्रीकांत उर्फ सोन्या खेडकर यांच्या तत्परतेचे कौतुक !

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नसरापूर : वेल्हा तालुक्याच्या घाटमाथा परिसरात सहज आढळणारा परंतु नसरापूरमध्ये आजवर कधीही न दिसलेला ‘पहाडी तस्कर’ साप पहिल्यांदाच येथे आढळून आला आहे. पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्व रक्षक असोसिएशनचे कार्यकर्ते आणि अनुभवी सर्पमित्र श्रीकांत उर्फ सोन्या खेडकर यांना हा साप केळवडे येथील हॉटेल कृष्णाई परिसरात दिसून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, खेडकर यांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तत्परतेने या सापाला सुरक्षितरीत्या पकडले. पुणे जिल्हा वन्य प्राणी सर्प रक्षक असोसिएशनचे अध्यक्ष सुशील विभुते यांच्या माहितीनुसार, त्यानंतर सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

‘पहाडी तस्कर’ (Coelognathus helena monticollaris) हा बिनविषारी, परंतु दुर्मीळ साप असून पश्चिम घाटातील डोंगराळ आणि दाट जंगलात तो आढळतो. याचे अंग हलक्या तपकिरी रंगाचे असून त्यावर काळे-पांढरे पट्टे असतात. नसरापूरसारख्या डोंगर पायथ्याच्या भागात त्याची उपस्थिती ही पहिल्यांदाच नोंदवली गेली असून यामुळे स्थानिक जैवविविधतेला नवा भर पडल्याचे मानले जात आहे.

श्रीकांत उर्फ सोन्या खेडकर हे अनेक वर्षांपासून वन्यजीव संरक्षण आणि साप बचाव मोहिमेत कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी असंख्य साप, पक्षी आणि इतर वन्यजीव सुरक्षितपणे वाचवून नैसर्गिक अधिवासात सोडले आहेत. त्यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

स्थानिक पर्यावरणप्रेमींनी याला एक महत्त्वपूर्ण घटना मानत, “नसरापूर परिसरात दुर्मीळ प्रजातींचा शोध आणि त्यांचे संरक्षण हे जैवविविधतेसाठी मोठे पाऊल आहे,” असे मत व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments