Tuesday, June 3, 2025
Homeक्राईम न्यूजधीरेंद्र शास्त्रींच्या प्रवचनावरून परतल्यानंतर 7 जणांनी का केली आत्महत्या? धक्कादायक कारण आले...

धीरेंद्र शास्त्रींच्या प्रवचनावरून परतल्यानंतर 7 जणांनी का केली आत्महत्या? धक्कादायक कारण आले समोर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पंचकुलाः हरियाणातील पंचकुला येथे तीन मुलांसह सातजणांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. हे कुटुंब मूळ उत्तराखंडमधील देहरादून येथील रहिवासी होते. सोमवारी रात्री सेक्टर २७ मध्ये एका कारमध्ये कुटुंब मृतावस्थेत आढळून आल्याने अनेकांना धक्का बसला होता. एका कारमध्ये सहा जण मृतावस्थेत आढळले, तर सातवा व्यक्ती गंभीर अवस्थेत होता. धीरेंद्र शास्त्री यांच्या धार्मिक प्रवचनाला कुटुंब गेले होते. प्रवचन संपल्यानंतर रात्री उशिरा या कुटुंबाने आत्महत्या केली.

दरम्यान, कारच्या जवळ गेल्यावर सहा जण मृत अवस्थेत असल्याचे एका व्यक्तीला दिसून आले, तर व्यक्ती जिवंत होता. आधीक कर्ज घेतल्यामुळे आत्महत्येचा निर्णय घेतला असे 7 व्या जिवंत व्यक्तीने एका स्थानिकला सांगितले. स्थानिकांनी तातडीने संपूर्ण माहिती पोलिसांना दिली, दरम्यान, गंभीर अवस्थेत असलेल्या व्यक्तीला रुग्णालयात घेऊन गेले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.

कारमध्ये सापडलेल्या दोन पानांच्या चिठ्ठीमध्ये लिहून होते कि, कुटुंबाने टूर आणि ट्रॅव्हल व्यवसायासाठी कर्ज घेतले होते, जे आता फेडू शकत नाही. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहून होते. दरम्यान, पोलिस अजूनही घटनेचा अधिक तपास करत आहे.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे, त्यांना हा आत्महत्येचा करार असल्याचा संशय आहे. अधिकारी कुटुंबाच्या आर्थिक नोंदी तपासत आहेत आणि या दुर्घटनेला कारणीभूत ठरणाऱ्या परिस्थिती निश्चित करण्यासाठी नातेवाईकांच्या मुलाखती घेत आहेत. अधिकारी पीडित समुदायाला समुपदेशन आणि मदत देण्याचे काम करत आहेत, तसेच या दुःखद घटनेच्या सभोवतालच्या परिस्थितीचाही तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments