Saturday, June 7, 2025
Homeक्राईम न्यूजधक्कादायक ! बापाचं राक्षसी कृत्य, मुंबईत पोटच्या दोन लेकींवर बलात्कार

धक्कादायक ! बापाचं राक्षसी कृत्य, मुंबईत पोटच्या दोन लेकींवर बलात्कार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : मुंबईतील कांदिवली परिसरातून बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या ८ आणि १० वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मागील सहा महिन्यापासून नराधम बाप हा पोटच्या दोन्ही मुलींवर वारंवार अत्याचार करत होता. या पीडित मुलींचे वय ८ आणि १० वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने आपल्या मुलींना ही बाब कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी नराधम बापाने केलेल्या दुष्कृत्याची माहिती कुणालाही सांगितली नाही. मात्र या प्रकरणाची माहिती पीडित मुलींच्या आईला समजताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेत नराधम बापाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच संबंधित आरोपी घटनेच्या ठिकाणाहून फरार झाला आहे. समता नगर पोलीस आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.

दरम्यान, पीडित मुलींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा गंभीरतेने तपास सुरू आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments