इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : गणरायाचे आगमन झाल्यानंतर पुण्यात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याचदरम्यान, एक धक्कदायक घटना समोर आली आहे. गणेशोत्सवाकरिता बंदोबस्तावर तैनात असलेल्या अग्निशमन दल व जीवरक्षक यांना पाण्यात एक अर्भक सापडले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
वारजे स्मशानभूमी घाट येथे गणेशोत्सवाकरिता बंदोबस्तावर तैनात असलेले अग्निशमन दल व जीवरक्षक यांना एक अर्भक (मुलगा) पाण्यात वाहताना दिसले. यानंतर जवानांनी तातडीने अर्भक बाहेर काढून पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि अर्भक पोलिसांच्या ताब्यात देऊन उपचाराकरिता रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
दरम्यान, पुणे पोलीस हे अर्भक पाण्यात कोणी सोडले? याबाबत तपास करत असून, सीसीटीव्ही तपासले जात आहेत. या घटनेबाबत पोलिसांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच हे अर्भक जिवंत आहे की नाही याबाबत देखील अद्याप माहिती समोर आलेली नाही