Monday, June 2, 2025
Homeक्राईम न्यूजधक्कादायक ; घरच्यांचा लग्नास विरोध होताच अल्पवयीन मुलीने उचललं टोकाचं पाऊल, डोंबिवलीतील...

धक्कादायक ; घरच्यांचा लग्नास विरोध होताच अल्पवयीन मुलीने उचललं टोकाचं पाऊल, डोंबिवलीतील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : डोंबिवलीमधील एका अल्पवयीन मुलीने घरच्यांनी मामाच्या मुलासोबत लग्न करण्यास नकार दिल्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आत्महत्येप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांकडून टिळकनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १७ वर्षाची अल्पवयीन मुलगी गेल्या सहा महिन्यांपासून तिच्या मामाच्या मुलाबरोबर सतत मोबाईल आणि इन्स्टाग्रामवर संपर्कात होती. लग्न करीन तर मामाच्या मुलाशीच अशी ती हट्टाने आणि आग्रहाने म्हणायची. परंतु, वडिलांनी मयत मुलीला मामाचा मुलगा चांगला नाही, त्याला नोकरी नाही. तसेच तू अद्याप सतरा वर्षाची आहे. तुझे अजून लग्नाचेही वय झाले नाही. त्यामुळे तू उगाच लग्नासाठी हट्ट धरू नकोस, असे सांगितले. तिला मामाच्या मुलासोबत लग्न करण्यास कुटुंबीय विरोध करत होते. आपले लग्न आपल्या मामाच्या मुलाबरोबर कुटुंबियांच्या विरोधामुळे होणार नाही. ते आपल्या लग्नाला सतत विरोध करत राहतील असा विचार करून अल्पवयीन मुलीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान मुलीची आई कपडे धुण्यासाठी बाहेर गेली असता त्यावेळेस मुलीने हे पाऊल उचलले. काही वेळाने आई घरात आली तेव्हा तिला मुलीने गळफास घेतला असल्याचे आढळले. तिने तात्काळ शेजाऱ्यांच्य मदतीने मुलीला पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments