Sunday, June 1, 2025
Homeक्राईम न्यूजधक्कादायक..! औंध येथे घरकाम करणाऱ्या महिलेनेच 5 लाखांचे दागिने केले लंपास; पोलिसांकडून...

धक्कादायक..! औंध येथे घरकाम करणाऱ्या महिलेनेच 5 लाखांचे दागिने केले लंपास; पोलिसांकडून अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुण्यातील औंध भागातून चोरीची घटना समोर आली आहे. येथे आई आणि भाऊ बाहेरगावी गेले असताना घरात एकट्या असणाऱ्या मुलीची नजर चुकवून घरकाम करणाऱ्या महिलेनेच घरातील 5 लाख रुपयांच्या दागिण्यावर डल्ला मारला आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर घरकाम करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. अलंका रामदास धरणे (वय 30 वर्ष, रा. जुनी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत कुमार विश्वदीप विश्वनाथ गाढवे (वय 25 वर्ष, रा. औंध) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार विश्वदीप विश्वनाथ गाढवे (वय 25 वर्ष, रा. औंध) हे औंध येथील एका सोसायटीत वास्तव्याला आहेत. 21 ते 25 एप्रिल दरम्यान फिर्यादी आपल्या आईसोबत कोल्हापूरला काही कामानिमित्त गेले होते. यावेळी त्यांची बहीण घरी एकटीच होती. दरम्यान आरोपी अलंका फिर्यादी यांच्या घरी काम करण्यासाठी येत असत. आरोपी अलंकाने घरी एकट्या असलेल्या गढवे यांच्या बहिणीची नजर चुकवून त्यांच्या आईचे घरातील 5 लाख 2 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि चांदीची साखळी चोरून लंपास केली.

फिर्यादी कोल्हापूर हुन आपल्या आईसह परत घरी आले तेंव्हा घरातील दागिने चोरीला गेल्याचे लक्ष्यात आले. त्यानंतर कुमार विश्वदीप यांनी तत्काळ चतुः शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस तपासात घरकाम करणाऱ्या अलंका हिने घरातील दागिने चोरल्याचे उघडकीस झाले. पोलिसांनी अलंका हिला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments