Tuesday, July 1, 2025
Homeक्राईम न्यूजदुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुण्यातील खराडी भागातून दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुजा आनंद सलगर (वय ३०, रा. खराडी) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यातदार महिला आणि तिची मैत्रीण दुचाकीवरुन गुरुवारी (२७ जून) रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास खराडी परिसरातून निघाल्या होत्या. तेंव्हा त्या न्याती मॉलसमोर आल्या असता तेथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी हिसकावली. त्यानंतर महिलेने आरडाओरडा केला असता चोरटे भरधाव वेगात पसार झाले.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक कोळपे तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments