इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शुक्रवारीही (१३ जून) पुण्यात जोरदार पाऊस झाला. सलग दोन दिवस पाऊस झाल्याने पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, अनेक भागतील रस्त्यांवर नद्या वाहत असल्यासारखे दृश्य आहे. पावसाच्या जोरदार बॅटिंगनंतर शुक्रवारी दिवेघाटातील धबधबे भरभरुन वाहत आहेत. याचे काही व्हिडिओ देखील मीडियावर व्हायरल होत आहेत.
पुण्यातील डोंगर माथ्यावर मुसळधार पाऊस झाल्याने घाट परिसरात धबधबे ओसंडून वाहत आहेत. तर दिवेघाटात धबधब्यांनी अक्षशः रौद्र रूप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. घाटातून मोठ्याप्रमाणात पाणी वाहत असून रस्त्यावर चिखल झाला आहे. अशातच वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गुरुवार आणि शुक्रवार सलग पाऊस पडल्यानंतर शनिवारी पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्याची चिन्हे आहेत. अशातच या विकेंडमध्ये पर्यटक डोंगर भागात धबधबे पाहण्यासाठी बाहेर पडू शकतात. तसेच पाण्याचा आनंद घेण्यासाठी घाटात गर्दी होऊ शकते. जर तुम्हीही असा काही प्लॅन करत असाल तर सावधगिरी बाळगा.
दरम्यान, विकेंडमध्ये घाट परिसरात कोणताही अपघात तसेच गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाला वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे.