Monday, June 2, 2025
Homeक्राईम न्यूजडाळिंबचे लोकनियुक्त सरपंच बजरंग (नाना) म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त 500 शालेय विद्यार्थ्यांना मोफत...

डाळिंबचे लोकनियुक्त सरपंच बजरंग (नाना) म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त 500 शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅगचे वाटप ; आमदार राहुल कुल, व भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित राहणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उरुळी कांचन, (पुणे): दौंड तालुक्यातील डाळिंब ग्रामपंचायतीचेलोकनियुक्त सरपंच बजरंग (नाना) सुदाम म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. 01) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उमेद चारेटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर बजरंग म्हस्के व संचालिका मोहिनी सुधीर म्हस्के यांनी दिली.

या कार्यक्रमाला दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, पुणे भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पंचक्रोशीतील आजी-माजी सरपंच, पदाधिकारी, सोसायट्यांचे सदस्य, यांच्या प्रमुख उपस्थितीत डाळिंब गावातील 500 शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅगचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच 10 वी व 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी उमेद चॅरेटिबल ट्रस्टचे विशेष सहकार्य लाभले असल्याची माहिती सुधीर म्हस्के यांनी दिली.

सदरचा कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (ता. 01) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास श्री क्षेत्र विठ्ठल देवस्थान (बन) डाळिंब (ता. दौंड) या ठिकाणी करण्यात आले आहे. तरी डाळिंब गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायतीचे उपसरपंच स्वप्नील संभाजी जरांडे, सदस्य सर्जेराव दत्तात्रय म्हस्के, सिमा रामदास सुतार, सागर रामदास म्हस्के, रविंद्र भाऊसाहेब म्हस्के, उषा दिपक म्हस्के, निलम सुनिल म्हस्के, लक्ष्मी भाऊसाहेब कांबळे, बबई नामदेव म्हस्के यांनी केले आहे.

दरम्यान, डाळींब गावचे कार्यसम्राट आदर्श नेतृत्व लोकनियुक्त सरपंच बजरंग (नाना) म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी गावातील सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी. तसेच कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments