Wednesday, June 4, 2025
Homeक्राईम न्यूजट्रक-दुचाकीचा भीषण अपघात..! रस्त्यावरील भेगा चुकवण्याच्या नादात दुचाकीस्वाराने गमावला जीव !

ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात..! रस्त्यावरील भेगा चुकवण्याच्या नादात दुचाकीस्वाराने गमावला जीव !

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बीडः ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तेलगाव-माजलगाव रस्त्यावर टालेवाडी फाट्या जवळ ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्यावरील भेगा चुकवण्याचा प्रयत्न करताना हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. महारूद्र भिमराव लोंढे (रा. खालापुरी ता. जि. बीड ह. मु. सुंदरनगर तेलगाव) असे मयत दुचाकीस्वराचे नाव आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महारूद्र हे तेलगाव तालुका धारूर येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यात नोकरीला होते. महारूद्र भिमराव लोंढे (रा. खालापुरी ता. जि. बीड ह. मु. सुंदरनगर तेलगाव) हे दुचाकी क्र. एम. एच. 23-7424 ने रविवार (1 जून) रोजी दुपारी तेलगावकडून माजलगावकडे जात होते. तेंव्हा तेलगाव-माजलगाव रस्त्यावर टालेवाडी परिसरात रस्त्याला पडलेल्या भेगा चुकवताना समोरून भरधाव वेगात येत असलेल्या ट्रकने क्र. एम. एच. 44-7371 जोराची धडक दिली. या भीषण अपघातात महारूद्र लोंढे यांची गाडी ट्रकच्या समोरच्या भागात अडकली, आणि गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस घटनास्थळी पोहचले. अधिक तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments