Thursday, July 31, 2025
Homeक्राईम न्यूजटिळेकरवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोवर्धन सुरेश टिळेकर यांची बिनविरोध निवड !

टिळेकरवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोवर्धन सुरेश टिळेकर यांची बिनविरोध निवड !

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उरुळी कांचन : टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोवर्धन सुरेश टिळेकर यांची गुरुवारी (ता. 24) बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

टिळेकरवाडीचे सरपंच गणेश निवृत्ती टिळेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे लोणी काळभोरच्या मंडल अधिकारी एल के बांडे, यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

सरपंच पदासाठी गोवर्धन टिळेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने मंडल अधिकारी बांडे, यांनी सरपंचपदी गोवर्धन टिळेकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. गोवर्धन टिळेकर यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत मोठा जल्लोष केला. ग्रामसेविक प्रवीण खराडे, व ग्राम महसूल अधिकारी उषा मुंडे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.

यावेळी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर, मावळते सरपंच गणेश टिळेकर, सुभाष लोणकर, सुभाष टिळेकर, उपसरपंच वैशाली चौरे, माजी उपसरपंच सुषमा टिळेकर, सुभाष टिळेकर, सोसायटीचे माजी अध्यक्ष आबासाहेब टिळेकर, पोलीस पाटील विजय टिळेकर, सदस्य सुशील राऊत, नंदा राऊत, कल्पना टिळेकर, प्रियंका कांबळे, टिळेकरवाडी सोसायटीचे अध्यक्ष अक्षय टिळेकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष राऊत, अशोक राऊत, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

“टिळेकरवाडी गावासाठी राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच टिळेकरवाडीसह परिसरातील मान्यवरांसह सर्व सदस्यांना बरोबर घेऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी तत्पर असणार आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments