Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजजामिनावर सुटलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; प्राचार्य, ट्रस्टींसह ७ जण गजाआड

जामिनावर सुटलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; प्राचार्य, ट्रस्टींसह ७ जण गजाआड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी (पुणे) : पिंपरी येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. सहा वर्षांपूर्वी शाळेतील मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या क्रीडा शिक्षकाने पुन्हा त्याच शाळेतील १२ वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार निगडी येथील शाळेत २०२२ ते २१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडला आहे.

निवृत्ती देवराम काळभोर (५६, रा. गुरुद्वारा चौक, चिंचवड) असं नराधम शिक्षकाचं नाव आहे. या नराधम शिक्षकासह प्राचार्य, ट्रस्टचा अध्यक्ष आणि इतरांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काळभोर हा क्रीडा शिक्षक पीडित मुलीशी अश्लील चाळे करत असे. २१ ऑगस्ट रोजी ती स्वच्छतागृहातून बाहेर येत असताना त्याने पुन्हा अश्लील वर्तन केले. हा प्रकार पीडित मुलीने घरी सांगितल्यानंतर नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

पुन्हा तेच कृत्य

शाळेतीलच अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी काळभोर याच्या विरोधात २०१८ मध्ये पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊन न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, अपिलात उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने काळभोर याला पुन्हा नोकरीत सामावून घेतले. हे लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांना प्रोत्साहन दिल्यासारखे असल्याने काळभोर याच्यासह प्राचार्य, ट्रस्टचे अध्यक्ष यांच्यावरही गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, निवृत्ती देवराम काळभोर (वय-५६, रा. गुरुद्वारा चौक, चिंचवड) या क्रीडा शिक्षकासह शाळेचे प्राचार्य अशोक सोपान जाधव (वय-५३, रा. प्राधिकरण चिखली) यांना न्यायालयाने २९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास बलभीम जाधव (वय-६३, रा. पिंपळे गुरव), अविंद अंकुश निकम (वय-३६), गोरख सोपान जाधव (वय-५०, दोघे चिखली), हनुमंत दादा निकम (व-६५, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) आणि शुभांगी अशोक जाधव (वय-५०) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments