Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजजागेची मालकी बदलली, तरी वीजबिल थकबाकी भरणे अनिवार्य; महावितरणने दिली महत्वाची माहिती

जागेची मालकी बदलली, तरी वीजबिल थकबाकी भरणे अनिवार्य; महावितरणने दिली महत्वाची माहिती

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः जागेची मालकी बदलली, तरी वीजबिलांची थकबाकी भरणे अनिवार्य आहे. ही थकबाकी जागेच्या नवीन मालकाकडून किंवा ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार महावितरणला आहे. या पार्श्वभूमीवर थकीत वीजबिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेली घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर जागा थकबाकीमुक्त करण्याची संधी महावितरण अभय योजना २०२४ मध्ये उपलब्ध झाली आहे. यात पुणे परिमंडलातील २ लाख ५३ हजार ३७४ वीजग्राहकांना फायदा होणार असून, मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराचे एकूण ७३ कोटी १४ लाख रुपये माफ होणार आहेत.

थकबाकीमुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीजग्राहकांसाठी ही योजना आहे. पुणे परिमंडलातील २ लाख ५३ हजार ३७३ अकृषक ग्राहकांकडे सद्यःस्थितीत ४७२ कोटी १४ लाख रुपयांची थकबाकी आहे. यातील मूळ थकबाकीपोटी ३९८ कोटी ९९ लाख रुपयांचा भरणा केल्यास व्याजाचे ६९ कोटी व विलंब आकाराचे ५ कोटी ५ लाख असे एकूण ७४ कोटी ५ लाख रुपये माफ होणार आहेत.

वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन मालक किंवा ताबेदार यांच्याकडून बकबाकीची रक्कम वसूल करण्याचा अधिकार वीज वितरण कंपन्यांना असल्याचे सर्वोच्चा न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे थकीत वीजबिलांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेली जागा थकबाकीमुक्त करण्यासाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments