इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पिंपरीतील 32 पर्यटक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामुळे पर्यटक भयभीत झाले असून प्रशासनाकडे सुरक्षित घरी परतण्यासाठी त्यांनी मदतीची मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसारन व्हॅलीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यान परिसरात भीतीच वातावरण आहे. पिंपरीतील 32 पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकले आहेत. त्यातील काही रावेत आणि चिंचवड परिसरातील रहिवासी आहेत. आपल्या घरी सुरक्षित परतण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आलेल्या हिंदू पर्यटकांना हल्लेखोरांनी लक्ष्य केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीनी केला आहे. या हल्ल्यामुळे पहलगाम आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. अडकलेल्या पर्यटकांच्या गाड्या स्थानिक प्रशासनाने सुरक्षा कारणास्तव जप्त केल्या असून, पुढील आठ दिवस त्या सोडल्या जाणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे.