Thursday, July 31, 2025
Homeक्राईम न्यूजचौफुला मधील प्रसिद्ध हॉटेल रघुनंदनला भीषण आग; आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान

चौफुला मधील प्रसिद्ध हॉटेल रघुनंदनला भीषण आग; आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

दौंडः दौंड तालुक्यातील बोरिपार्धी-चौफुला येथील सुप्रसिद्ध हॉटेल रघुनंदन येथे आग लागल्याची घटना घडली होती. काल मध्यरात्रीच्या सुमारास, अंदाजे सव्वादोन वाजता लागलेल्या या आगीत सुमारे एक कोटी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले, परंतु तोपर्यंत हॉटेलचे मोठे नुकसान झाले होते.

हॉटेलचे मालक रघुनाथ सरगर यांनी सांगितले की, मोठ्या परिश्रमातून हॉटेल सुरु केले होते. या अचानक उद्भवलेल्या घटनेने अनेक वर्षांच्या कष्टावर पाणी फिरले गेले, मोठा आर्थिक फटका बसला आहे. या आगीत हॉटेलमधील सर्व मौल्यवान फर्निचर आणि आतील सर्व शोभेच्या वस्तूंसह संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments