Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजचोरांचा सुळसुळाट ! पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतून 300 मोबाईल चोरीला

चोरांचा सुळसुळाट ! पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतून 300 मोबाईल चोरीला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात गणेस विसर्जन थाटामाटात केले. लाखोंच्या संख्येने गणेशभक्त लाडक्या बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी जमले होते. मात्र, याचवेळी मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. गणपती मिरवणुकीदरम्यान 300 जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत.

याप्रकरणी मध्यभागातील फरासखाना, विश्रामबाग, खडक, समर्थसह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी मोठी गर्दी झाली होती. सर्वाधिक गर्दी लक्ष्मी रस्त्यावर झाली होती. बेलबाग चौक ते लोकमान्य टिळक चौकात मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत.

दरम्यान, पुण्यात बाप्पांचे दर्शन घेण्यात भाविक तल्लीन झाले असताना मोबाईल चोरांनी तीच संधी साधली. चोरांनी गर्दीचा फायदा घेत अनेक मोबाईल चोरले. गणेशोत्सव काळात अनेक चोरट्यांनी महागडे मोबाइल चोरल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मोबाइल चोरीला गेल्याची तक्रारी नागरिकांनी पोलिसांकडे दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments