इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. चुलतीला आय लव्ह यू म्हणाल्यामुळे संतापलेल्या पुतण्याने एका तरुणाला संपवलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
ही घटना पुण्यातील चंदनगरमध्ये घटना घडली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील चंदननगर परिसरातील आंबेडकर वसाहतीमध्ये राहणाऱ्या साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५ वर्षे) या तरुणाने आपल्या चुलतील आय लव्ह यू म्हंटल्यामुळे संतापलेल्या पुतण्याने त्याची हत्या केल्याचं समोर येत आहेत.
साईनाथने त्याच्या चुलतीला आय लव्ह यू म्हणत तिची छेड काढली होती. याचाच राग आल्यामुळे संतोष आणि पप्पू या दोघांनी साईनाथला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या साईनाथचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी तिथून फरार झाले होते.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत साईनाथचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर चंदननगर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध घेतला आणि दोघांना बेड्या ठोकल्या.