Monday, July 7, 2025
Homeक्राईम न्यूजचारित्र्याच्या संशयावरून झोपलेल्या पत्नीवर चाकूने 15 वेळा केले सपासप वार, दोन चिमुकल्यांसमोर...

चारित्र्याच्या संशयावरून झोपलेल्या पत्नीवर चाकूने 15 वेळा केले सपासप वार, दोन चिमुकल्यांसमोर आईची निघृण हत्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी मुंबईः नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची निघृणपणे हत्या केली आहे. ही घटना नवी मुंबईतील सेक्टर १९ येथे घडली असून, त्यानंतर पतीने स्वतःवरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पतीने मुलांच्या समोर पत्नीच डोक भिंतीवर आपटले तसेच चाकूने 10 ते 15 वार केले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ३५ वर्षीय गणेश शिरसाट याने आपली पत्नी गौरी शिरसाट हिच्यावर धारदार शस्त्राने अनेक वार केले. हे कृत्य दोन लहान मुलांसमोरच घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गौरीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर गणेशने स्वतःलाही जखमी करून घेतले. त्याला तातडीने उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून अनेकदा वाद होत होते. यातूनच ही भीषण घटना घडल्याचा संशय आहे. दोघांना ८ आणि २ वर्षांची दोन मुले आहेत, त्यापैकी मोठा मुलगा मतीमंद आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोपरखैरणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments