Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजघोडगंगा प्रशासना विरुद्ध किसान क्रांती पदयात्रेला सुरुवात

घोडगंगा प्रशासना विरुद्ध किसान क्रांती पदयात्रेला सुरुवात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

न्हावरे : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाविरुद्ध सर्वपक्षीय घोडगंगा किसान क्रांती समितीच्या पदयात्रेला आज (दि.२२) मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील श्री. वाघेश्वर मंदिरातून सुरुवात झाली. घोडगंगा साखर कारखाना २०२३-२०२४ च्या गाळप हंगामापासून बंद आहे तसेच, कारखान्याच्या कामगारांचे पगारही अनेक महिन्यांपासून रखडलेले आहेत.

त्यामुळे कारखान्याचे गाळप सुरू व्हावे व त्यासाठी काहीतरी तोडगा निघावा म्हणून घोडगंगा किसान क्रांती समितीच्या वतीने संपूर्ण तालुक्यामध्ये २२ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर दरम्यान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिरूर व हवेली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजपा व शिवसेना (शिंदे गट) यापक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व कारखान्याचे सभासद उपस्थित होते.

याप्रसंगी घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक दादापाटील फराटे, शिरूर तालुका राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अध्यक्ष रवी काळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनावणे, शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, जिल्हा बँकेचे संचालक व माजी जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रमुख नेते राजेंद्र कोरेकर, शांताराम कटके, शिरूर बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी जि.प. सदस्य राहुल पाचर्णे, राजेंद्र जगदाळे यांनी घोडगंगा कारखाना प्रशासनाविरोधात आपापली मनोगते व्यक्त केली व तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments