Monday, June 2, 2025
Homeक्राईम न्यूजगाय दूध विक्रीदरात वाढ न करण्याचा कात्रज डेअरीचा निर्णय

गाय दूध विक्रीदरात वाढ न करण्याचा कात्रज डेअरीचा निर्णय

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः सध्या सर्व दूध संघांनी दूध विक्रीच्या दरात रु. २/- ने वाढ केलेली आहे. तथापि, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने सर्वसामान्य ग्राहकांचा विचार करून गाय दूध विक्री दरात वाढ न करण्याचा निर्य घेतलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कात्रज दुधाच्या ग्राहकांना दूध खरेदीमध्ये दिलासा मिळणार आहे. सध्या पुणे जिल्हा संघ जिरा ताक, लस्सी व दही माफक दरामध्ये विक्री करत असल्यामुळे उत्कृष्ट दर्जाची उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देत असल्यामुळे या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सिझनमध्ये ताकाची ४५ हजार लीटर एवढी उच्चांकी विक्री प्रतिदिन पार केलेली आहे.

तसेच कात्रज दूध संघ पुणे जिल्ह्यातील गावांमधून दूध संकलन करत असून अगदी कमी वेळात अतिशय उत्कृष्ट दर्जाचे गाय दुध ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे. तरी सध्या गाय दूध विक्री दरामध्ये वाढ करणार नसून, सर्व ग्राहकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे संघाचे चेअरमन स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. तरी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सर्व ग्राहकांना संघामार्फत जाहीर आवाहन करणेत येते की, कात्रज डेअरीचे दुधाच्या दरात कोणी वितरकांनी अतिरिक्त पैशाची मागणी केल्यास त्यांच्याबाबत संघाच्या ग्राहक तक्रार निवारण नंबरवर संपर्क करून कळविण्यात यावे. तसेच संघाचे दूध दरवाढीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments