इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः लोहीयानगर परिसरात किरकोळ वादातून झालेल्या खून प्रकरणात खडक पोलिसांनी केवळ दोन तासांत आरोपीला जेरबंद करत उत्कृष्ट कामगिरी बजावली. घटना ६ ऑगस्ट २०२५ रोजी घडली होती. इनामके मळा, पत्र्याचे शेडजवळ, लोहीयानगर येथे सागर राजू अवघडे (वय ३३) याचा त्याच्या मामाचा मुलगा सुरज नंदू सकट (वय २५) याने गाडीची चावी न दिल्याच्या कारणावरून नाका-तोंडावर बुक्यांनी मारहाण करून खून केला. घटनेनंतर आरोपी पसार झाला होता.
पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती शर्मिला सुतार व श्री. मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व्हेलन्स पथकाने शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, पोलिस अंमलदार आशिष चव्हाण आणि इरफान नदाफ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, तपास पथकाने म्हसोबा मंदिर चौक परिसरातून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ श्री. ऋषिकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग श्रीमती अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलिस अंमलदार आशिष चव्हाण, इरफान नदाफ, अक्षयकुमार वाबळे, विश्वजित गोरे आणि कृष्णा गायकवाड यांनी केली आहे.