Tuesday, July 1, 2025
Homeक्राईम न्यूजगांजा विक्रीसाठी आलेल्या इसमाला अटक; ३ लाखांचा गांजा जप्त

गांजा विक्रीसाठी आलेल्या इसमाला अटक; ३ लाखांचा गांजा जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शहरात अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत विमानतळ पोलिसांनी रविवारी (२२ जून) सायंकाळी गांजा विक्रीसाठी आलेल्या एका इसमाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून तब्बल तीन लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अखिलेश गरीब मंडण (वय ३४ वर्ष, रा. लोहगाव) असे आहे. या प्रकरणात पोलीस शिपाई हरिप्रसाद नवनाथ पुंडे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी मंडण हा लोहगाव वाघोली सार्वजनिक रस्त्याजवळील कर्मभूमीनगर परिसरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

अटक केल्यानंतर आरोपीकडून सुमारे ३ लाख किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments