इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील गंगाधाम चौकात दुपारच्या वेळी एका ट्रकने दुकाचाकीस्वराला टक्कर दिल्याने महिलेचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर आज सुखसागरनगर परिसरात एका कारच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
हा अपघात पुण्याच्या कात्रजमधील सुखसागरनगरमध्ये झाला असल्याचे समोर येत आहे. एका भरधाव येणाऱ्या व्हॅगनार कारने एका तरुणीला चिरडले ज्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव श्रेया गौतम येवले असे आहे. तरुणी २१ वर्षांची असल्याचे सांगितले जात आहे.
ही तरुणी शीतल हाईट्स, खंडोबा मंदिराजवळ, कोंढवा येथे राहत होती. तर कात्रजमधील सुखसागरनगर येथे तिला व्हॅगनार कार चिरडले. हा अपघात इतका भयंकर होता की, तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, कार चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दुसरीकडे, पुण्यातील चांदणी चौक, जो सततच्या वाहतूक कोंडीसाठी ओळखला जातो, याठिकाणी देखील गुरुवारी रात्री एक भीषण अपघात झाला. एका मालवाहू ट्रकच्या चालकाने समोर अचानक आलेल्या वाहनाला वाचवण्यासाठी अचानक ब्रेक लावला या घटनेत, ट्रकच्या ट्रॉलीमध्ये भरलेल्या लोखंडी सळ्या केबिनमध्ये घुसल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. पुण्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढत असल्याने पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.