Sunday, June 8, 2025
Homeक्राईम न्यूजकेंद्र सरकारची ३५ एफडीसी औषधींवर बंदी

केंद्र सरकारची ३५ एफडीसी औषधींवर बंदी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली : देशात बंदी घालण्यात आलेले ३५ फिक्स्ड-डोसकॉम्बिनेशन (एफडीसी) औषधींचे उत्पादन, विक्री व वितरण रोखण्याचे निर्देश देशातील सर्वोच्च औषधी नियमन संस्था सीडीएससीओने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील औषध नियंत्रकांना दिले. यामध्ये वेदनाशामक, मधुमेहावरील औषधींचा समावेश आहे.

एफडीसी औषधींमध्ये एक निश्चित प्रमाणातं दोन किंवा त्यापेक्षा अधिक औषधी घटकांचे संयोजन असते. सीडीएससीओने अशा ३५ एफडीसींवर बंदी घातली आहे. काही एफडीसी औषधींची सुरक्षा व प्रभावीपणाचे मूल्यांकन न करताच त्यांचे उत्पादन, विक्री व वितरणाचा परवाना देण्यात आल्याचे सीडीएससीओला

आढळले. यामुळे लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात भारतीय औषधी महानियंत्रक डॉ. राजीव रघुवंशी यांनी जानेवारी २०१३ मध्ये त्यांच्या कार्यालयाने पाठवलेल्या पत्राचा दाखला दिला.

डीसीजीआयकडून परवानगी मिळाल्याशिवाय एफडीसी औषधींना परवाना देण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. राज्यांना याबाबत वेळोवेळी सूचना देऊन संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. अशा प्रकारचे ताजे निर्देश फेब्रुवारी महिन्यात देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने सीडीएससीओने बंदी घातलेल्या ३५ एफडीसी औषधींचे उत्पादन, विक्री व वितरण रोखण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments