इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्याच्या कात्रज येथील सच्चाई माता येथील गगनगिरी कमानीजवळ साईनगरमधील गल्ली ३ येथील घरावर आंबेगाव पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने जेसीबी चालवून अनधिकृत घर जमीनदोस्त केले आहे. या घराशेजारील बाजूचे पत्र्याचे शेडही पाडण्यात आले आहे.
याबाबत आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने म्हणाले की, या पत्र्याच्या शेडमध्ये काही महिला बेकायदेशीरपणे अवैध दारु विक्री करत असायच्या. येथे पोलिसांनी वारंवार कारवाई करून दारुचे कॅन जप्त केले.
पोलिसांनी अवैधपणे दारू विक्री करणाऱ्या महिलांवर वेळोवेळी कारवाई केली. मात्र, तरीही या महिलांकडून पुन्हा तेथे अवैध दारु विक्री करत असल्याचे आढळून आले असल्याने या अनधिकृत घरावर महापालिकेच्या सहाय्याने जेसीबी लावून घर व पत्र्याचे शेड जमीनदोस्त करण्यात आले.